NIA raids on Dawood Ibrahim
NIA raids on Dawood Ibrahim team lokshahi

मुंबईत NIA ची मोठी कारवाई; दाऊदशी संबंधित अनेक जणांवर छापे

नागपाडा, गोरेगाव, बोरीवली सांताक्रुज, भेंडी बाजारातही छापेमारी
Published by :
Shweta Chavan-Zagade

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्याशी संबंधित मुंबईतील 20 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. एनआयएने सोमवारी सकाळी या कारवाईला सुरुवात केली असून भेंडीबाजार नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, भिवंडी, सांताक्रुझ येथील एकूण २० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.

NIA raids on Dawood Ibrahim
Live Update : NIA कडून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील २० ठिकाणांवर छापे

दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शुटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) फेब्रुवारी महिन्यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद गँग मुंबईत पुन्हा सक्रिय झाली होती. त्यांच्याकडून देशातील काही प्रमुख व्यक्तींना इजा किंवा घातपात करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. याच माहितीच्याआधारे एनआयएने आजची कारवाई केल्याचे सांगितले जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com