ठाकरे म्हणे सुसंस्कृत, यापेक्षा मोठा विनोद नाही, निलेश राणे यांची टीका

ठाकरे म्हणे सुसंस्कृत, यापेक्षा मोठा विनोद नाही, निलेश राणे यांची टीका

Published by :

सचिन वाझे प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. वरुण सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राणे कुटुंबीयांची पार्श्वभूमी काढली होती. त्यावरून नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलेले असतानाच त्यांचे बंधू निलेश राणे यांनीही यात उडी घेतली आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि वरुण सरदेसाई यांच्यात संभाषण झाल्याचा दावा नितेश राणे यांनी काल केला होता. तर, सरदेसाई यांनी हे आरोप फेटाळून लावत बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच, माझ्यावर आरोप केले त्या राणे कुटुंबाची पार्श्वभूमी सर्वश्रुत आहेच. मग त्यांची ती सुरुवातीची गँग असो व नंतर खून, अपहरण, खंडणी असे विविध गंभीर गुन्हे त्या कुटुंबावर दाखल आहेत, असे त्यांनी सांगितले. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत.

यावर भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनीही सरदेसाईंवर टीका केली आहे. ठाकरेंचा नातेवाईक सरदेसाई सारखा बेवडा, जुगारडा, मटका छाप म्हणतो अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार; पण मुळात त्यासाठी अब्रू असावी लागते. ठाकरे म्हणे सुसंस्कृत, यापेक्षा मोठा विनोद नाही. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किंवा सोनू निगमला विचारा, असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे. ठाकरे आणि त्यांच्या कुत्र्यांनी जास्त नाटक केले तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी सर्व महाराष्ट्राला सांगून टाकणार, असेही त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com