सरकारच्या जीआरवर ‘औरंगाबाद’चे झाले ‘संभाजीनगर’!

सरकारच्या जीआरवर ‘औरंगाबाद’चे झाले ‘संभाजीनगर’!

Published by :

गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचेही दिसून आले. दुसरीकडे सरकारी पातळीवर अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र, आता राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन निर्णयावर 'औरंगाबाद'च्या अगोदर 'संभाजीनगर' असा उल्लेख केला गेला आहे.

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यासाठी शासन स्तरावरही औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवून हालचाली केल्या होत्या. मात्र आता थेट शासनाच्या 'जीआर'वरच संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्य शासनाने राज्य जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदमध्ये उद्योजक राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे. त्याचा जीआर सरकारने काढला आहे. त्या जीआरमध्ये राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि नंतर औरंगाबाद असा उल्लेख केला आहे. त्यामुळे कागदोपत्री संभाजीनगर असे नामकरण होतंय का?, या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com