पर्यावरणाला हानिकारक असलेल्या नायलॉन दोऱ्याच्या विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची विशेष मोहीम
प्रशांत जव्हेरी|नंदुरबार: गुजरात प्रमाणे नंदुरबार मध्ये ही मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जातो पतंग उत्सवात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर केला जात असतो. नायलॉन मांजा हा हानिकारक असून यातून अनेक अपघात होत असतात त्याचसोबत अनेक पक्षीही जायबंदी होत असतात त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी केलेल्या मागणीनुसार सरकारने नायलॉन मांजावर बंदी घातले आहे.
मात्र, पतंग उत्सवासाठी पतंगबाजी करणारे नायलॉन मांजाला पसंती देत असतात बंदी असली तरी मोठी मागणी असल्याने चोरून मोठ्या प्रमाणात या मांजाची विक्री होत असते, त्यामुळे नंदुरबार शहर पोलीस दलाच्या वतीने शहरातील पतंग विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली जात असून त्यात एक जण नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला असून त्यावर नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे ही मोहीम अजून तीव्र करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जर आपण नायलॉन मांजा वापरत असणार तर आपल्यावरही कारवाई होऊ शकते. पर्यावरण आणि मानव यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन होणे जरुरीचे आहे.