स्कूल चले हम! शाळेची पहिली घंटा वाजणार

स्कूल चले हम! शाळेची पहिली घंटा वाजणार

School Reopen : प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा आजपासून सुरु

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा पुन्हा सुरु (School Reopen) होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. यानुसार आजपासून शाळांची घंटा वाजली आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांच्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाही सज्ज झाल्या आहेत.

स्कूल चले हम! शाळेची पहिली घंटा वाजणार
जे करायचे ते रणांगणात; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना इशारा

राज्यातील शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार 13 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं. तर, आजपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करताना शाळा आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही कोरोनाचे सर्व नियम पाळूनच शाळेत येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, शाळांसाठीही नवीन एसओपी जारी केली असल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली.

विदर्भातील मात्र शैक्षणिक वर्ष 23 जूनपासून सुरु होणार आहे. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता 27 जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत बोलावण्यात यावं, असे निर्देश देण्यात आले आहेत.

स्कूल चले हम! शाळेची पहिली घंटा वाजणार
समृद्ध वारश्यांबद्दल भारतीय उदासिन; PM Modi यांनी व्यक्त केली खंत

शालेय शिक्षण विभागाने २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकही घोषित केले आहे. शालेय शिक्षण विभागाच्यापरिपत्रकानुसार, यावर्षी शाळा २३७ दिवस सुरू राहणार आहेत. शाळेचे पहिले सत्र ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तर दुसरे सत्र ९ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. सुट्ट्यांच्या बाबतीत मात्र यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चंगळ असणार आहे. या वर्षी २० अतिरिक्त सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. तसेच दिवाळीच्या २६, उन्हाळ्यामध्ये ३६ आणि अतिरिक्त ४ अशा ७६ मिळणार आहेत. यामध्ये रविवारच्या ५२ सुट्ट्यांचा समावेश केलेला नाही. म्हणजे यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकूण १२८ सुट्ट्या मिळणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com