MPSC Student Protest
MPSC Student Protest

MPSC Student Protest : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

Published by :

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सूरू केले आहे. भरती प्रक्रिया पुन्हा सूरू करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी अलका चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुण्यातील अलका चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न थेट रद्द झाले. या विरोधात काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या परीक्षेची मुख्य परीक्षा गेल्या तीन महिन्यांपासून रखडली होती.आयोगाने जे प्रश्न बरोबर होते ते बरोबर द्यावेत व फेर निकाल लावून परीक्षा लवकरात लवकर घ्यावी ही विद्यार्थ्यांची मागणी होती.

या प्रकरणात एमपीएससीने तोडगा काढावा अशी मागणी करत पुण्यातील विद्यार्थ्यांनी आज अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरु केले. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com