Raju Shetty `
Raju Shetty `Team Lokshahi

एफआरपीसंबंधी बेकायदेशीर कायदा करण्यात आला तरी हसन मुश्रीफ, आमदार यड्रावकर गप्प का बसले - राजू शेट्टी

ऊसाला दर किती घ्यायचा ते आम्ही ठरवू
Published by :
Sagar Pradhan

सतेज औंधकर।कोल्हापूर: यंदा उसाची एफआरपी एकरकमी तर घेऊच ऊसाला दर किती घ्यायचे ते आम्ही १५ ऑक्टोबरच्या ऊस परिषदेत ठरवू असे म्हणतं पुढे ते म्हणाले की, एफआरपी द्यायचीच होती तर महाविकास आघाडी सरकारने एफआरपीची मोडतोड करण्याचा बेकायदेशीर कायदा केला, त्यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे गप्प का बसले, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

Raju Shetty `
मोदी ओबीसी नाहीत, लवकरच पुरावे देऊ; पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने यंदा एकरकमी एफआरपी देतील, असे सुतोवाच केले. तर बँकेचे संचालक आमदार यड्रावकर यांनी ऊसाच्या गाडीचे टायर न फोडण्याचा अनाहूत सल्ला देखील दिला. शेतकरी काय गंमत म्हणून टायरी फोडत नाही. ज्यावेळी साखर कारखानदारांकडून शेतकर्यांची पिळवणूक होते व त्याला रस्त्यावर यायला भाग पाडतात, त्यावेळी त्याच्याकडून घडलेली ही प्रतिक्रिया असते. विधीमंडळामध्ये एफआरपीचे तुकडे करण्याचा बेकायदेशीरपणे कायदा मंजूर केला, त्यावेळी हे दोघे मंत्री तोंड मिटून गप्प का बसले, या प्रश्नाचे उत्तर शेतकरी मागत आहेत.

एका बाजूला एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा केला तर दुसरीकडे शेतकर्यांच्या संघटीत शक्तीपुढे लोटांगण घालून एफआरपी देण्याची तयारी दाखवायची, तुम्ही असले धंदे बंद करा. गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी सोडून अधिक दोनशे रूपये द्यावे लागतील. इथेनॉल मधून चांगला पैसा मिळालेला आहे. साखरेला दर चांगला मिळाला आहे. एफआरपी पेक्षा जास्त किती देताय ते सांगा,मग आम्ही ऊस परिषदेत ठरवू, उसाला किती दर घ्यायचे ते. अशी प्रतिक्रिया यावेळी राजू शेट्टी यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com