विधानपरिषदेत सदस्यांची निवृत्ती; फोटो काढताना गैरहजर राहील्याने ‘त्या’ दोन भाईंची एकच चर्चा

विधानपरिषदेत सदस्यांची निवृत्ती; फोटो काढताना गैरहजर राहील्याने ‘त्या’ दोन भाईंची एकच चर्चा

विधान परिषदेतून आज सहा सदस्य निवृत्त झाले. या सदस्यांना निरोप देतानाच्या फोटो दरम्यान काँग्रेस नेते भाई जगताप आणि दुसरे शिवसेना नेते रामदास कदम, हे दोन भाई अनुपस्थित राहीले होते. रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत फोटो काढायला नको म्हणून अनुपस्थिती दर्शवली.त्यामुळे दोन्ही भाईंनी फोटो काढताना दांडी मारल्याने त्याचीच अधिक चर्चा रंगली होती.

आज विधान परिषदेतून भाई जगताप, रामदास कदम, वरुणकाका जगताप, गिरीष व्यास, गोपीचंद बजोरीया आणि प्रशांत परिचारक हे सहा सदस्य निवृत्त झाले. विधान परिषदेच्या निवृत्त सदस्यांसाठी विधान परिषद सभापती आणि उपसभापती यांच्या बरोबर विधीमंडळाच्या कामकाजाची आठवण म्हणून फोटो काढला जातो. पण हा फोटो काढते वेळी रामदास कदम आणि भाई जगताप हे अनुपस्थित राहिले.

अनिल परब यांच्या बरोबर फोटो काढला जाऊ नये म्हणून रामदास कदम हे अनुपस्थित राहिले अशी चर्चा सुरू आहे. याचवेळी भाई जगताप यांनी अनुपस्थित राहून कोणाबद्दल नाराजी व्यक्त केली असा सवाल केला जात आहे. मात्र, दोन्ही भाई अनुपस्थित राहिल्याने दिवसभर चर्चा सुरू होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com