Police | राज्यातील महिला पोलिसांना दिलासा; कामाच्या तासांबाबत मोठा निर्णय

Police | राज्यातील महिला पोलिसांना दिलासा; कामाच्या तासांबाबत मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांना दिलासा दिला आहे. महिला पोलिसांसाठी कामाची वेळ 12 तासांवरून 8 तासांवर करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून महिला पोलिसांची कामाची वेळ कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र आता याचा निर्णय झाला आहे. महिला पोलिसांच्या कामाची वेळ कमी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर महिला पोलिसांना दिलासा मिळणार आहे. महिला पोलीस त्यांच्या कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकणार आहेत.

कामाच्या 8 तासांचा निर्णय प्रायोगिक तत्वावर असणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी महिला पोलिसांना 8 तासांचे काम करण्यात आले होते.हा निर्णय यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पोलीस दलात याची अंमलबजावणी करण्यात आली.

पोलीस दलात महिला मोठ्या संख्येने कर्तव्य बजावत असतात. महिला पोलिसांचे कामाचे 4 तास कमी होणार हा त्यांच्यासाठी सुखद क्षण असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com