शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झाल्यानंतर  रोशनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; माझी चूक काय?

शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झाल्यानंतर रोशनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; माझी चूक काय?

ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

मुंबई : ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. फेसबुक पोस्ट टाकल्याने ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या महिलेला जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीडितेची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.

शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झाल्यानंतर  रोशनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; माझी चूक काय?
शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंबाबत डॉक्टरांची प्रतिक्रिया म्हणाले...

सर्वात जास्त आनंद महिलेला गर्भवती होण्याचा असतो. आज मी आई होण्याकरिता उपचार घेतले. जेव्हा माझ्यावर पहिला हल्ला झाला. तेव्हा मी त्यांना सांगितले माझ्या पोटावर लात मारू नका. माझ्यावर उपचार सुरू आहेत. तरी सुद्धा ते लोक पोटावर लात मारत होते. माझ्या जीवाचे बर वाईट झाले तर याला जबाबदार कोण असणार आहे, असा प्रश्नदेखील रोशनी शिंदे यांनी उपस्थित केला.

मी पोलिसांना देखील सांगितले की मला त्रास होतोय. मी पोलीस स्थानकात चक्कर येऊन पडले. उलट्या होत होत्या तरीदेखील कोणी लक्ष देत नव्हते. खासदार विचारे मला उपचाराकरिता सिव्हीलमध्ये घेऊन गेले. तिथेही माझ्यावर कोणी लक्ष देत नव्हते. शेवटी मला प्राइवेटमध्ये मला दाखल करण्यात आले. मला इतकचं सांगा की माझी चूक काय आहे? मी कुणाची नावे घेऊन बोलली होते का? दत्ता गावस हे जर महिलांना बोलत असतील तर आम्ही का म्हणून गप्प राहायचे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला मारले आहे. पोलिसांना बोलून देखील कारवाई केली नाही. माझी नगरसेविका नम्रता भोसले, पूजा तिडके या दोन महिला मला सतत त्रास देत होत्या. मला माफी मागण्याची व्हिडीओ तयार करण्यास सांगितले. मी त्यांना ती व्हिडीओही करून दिली होती, असेही रोशनी शिंदे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी अक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले होते. मी माझ्या कमेंटमध्ये कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचा उल्लेख केला नसतानाही मला वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले होते. याप्रकरणी सखोल चौकशी करून तत्काळ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करा. अशी त्यांनी मागणी केली आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com