Maratha Reservation : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसोबत छत्रपती संभाजीराजेंची गुप्तगू
Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजेंनी (Chatrapati Sambhajiraje)आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाचे प्रश्नांसंदर्भात सरकारने बैठक घेऊन प्रश्न सोडवावेत ही मागणी केली. तसेच राज्यातील गडकोट बुरुजांच्या संवर्धानासाठी राज्यसरकारने पुढाकार घेण्याबाबत चर्चा केली.
ओबीसींना आरक्षणाचा मार्ग बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला. आता त्यापाठोपाठ मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्नावर चर्चा सुरु झाली. छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांनी मराठा आरक्षण व सामाजेचे इतर प्रश्न यावर काम सुरु केले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीची माहिती गुलदस्त्यात असला तरी मराठा समाजातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. याबाबत संभाजी राजेंनी मात्र अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. मराठा समाजाच्या विविध प्रश्नासाठी वेळोवेळी संभाजी राजे हे रस्त्यावर हे उतरले होते. त्यांनी राज्यभर अनेक मोर्चे काढले, तसेच अनेक आंदोलन केली.
शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आशा वाढली
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती विराजमान झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वात आता मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघणार का? असा सवाल विचारला जात आहे. नवं सरकार आल्यानंतर आता आरक्षणाच्या अशाही पुन्हा वाढल्या आहेत, त्यासाठीच या राजकीय भेटीगाठी सुरू आहेत.