Save Soil
Save SoilTeam Lokshahi

Save Soil : सद्गुरूंच्या 100 दिवसीय 'माती वाचवा' अभियानाची सांगता

3.2 अब्ज लोकांनी उठवला मातीसाठी आवाज, 74 राष्ट्रे, 8 भारतीय राज्ये, 9 संयुक्त राष्ट्र संघटना ‘माती वाचवा’ मोहिमेमध्ये घेतला सहभाग
Published by :
shamal ghanekar

22 जून 2022, कोयंबतूर : 27 राष्ट्रे आणि 11 भारतीय राज्यांतून 100 दिवसांच्या एकट्या मोटरसायकल प्रवासाचा समारोप करत ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू ईशा योग केंद्रातील प्रतिष्ठित आदियोगी येथे हजारो लोकांच्या जोरदार स्वागतासाठी पोहोचले. पारंपारिक आरतीने सुरुवात करून सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्रीचे आकाश उजळून टाकणाऱ्या मशालींसह सद्गुरूंचे स्वागत केले गेले. गेले 3 महिने माती वाचवा मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांच्या 30,000 किमी दुचाकी प्रवासावरून ते परतले आहेत, ज्यामध्ये 3.2 अब्ज लोकांनी मातीसाठी आवाज उठवला आहे.

गेल्या 100 दिवसांत 600 हून अधिक माती वाचवा कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्यानंतर मोहिमेच्या पुढच्या टप्प्याबद्दल बोलताना, जीवघेण्या प्रवासाचा संदर्भ देत सद्गुरूंनी स्पष्टीकरण दिले की “जरी धोकादायक प्रवास आता संपला असेल तरी खरी मेहनत आतापासून सुरू होईल”. पुढील काही महिन्यांत, सद्गुरू यु.के, यू.एस.ए. तसेच दक्षिण अमेरिकन आणि कॅरिबियन राष्ट्रांसह वीसहून अधिक राष्ट्रांमध्ये जाऊन मातीचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी धोरणात्मक कार्यवाही सुनिश्चित करतील. “12-18 महिन्यांच्या दरम्यान, बहुतेक राष्ट्रांना आपण काही प्रकारचे मातीच्या पुनरुज्जीवनासाठीचे धोरण बनवण्याकडे नेऊ शकतो,” असे म्हणत सद्गुरूंनी माती वाचवण्याच्या दिशेने सकारात्मक आणि तातडीची कृती घडून येण्याबद्दल विश्वास व्यक्त केला.

मातीच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय धोरणातील बदल घडवून आणणे, शेतजमिनीवरच्या मातीत किमान 3-6% सेंद्रिय सामग्री अनिवार्य करणे असे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. अशा सुधारक बदलांसाठी लोकांचा आवाज हा सर्वात महत्त्वाचा पैलू असल्याने, सद्गुरूंनी लोकांना पुढील एक वर्ष मातीबद्दल, “जगाशी, दररोज नवीन कोणाशी तरी, किमान 10 मिनिटे” बोलत राहण्याचे आणि ह्या प्रवासाबरोबर तुमचा आवाज न थांबवण्याचे आवाहन केले.

ईशाच्या स्वयंसेवकांचे योगदान पाहून, सद्गुरुंनी ट्विट मध्ये लिहिले, “माती वाचवा (#SaveSoil) मोहिमेला पूर्ण करण्यासाठी अविश्वसनीय समर्पणाच्या आणि निग्रहाच्या भावनेने एकत्र आलेल्या जगभरातील टीम ईशाचे अभिनंदन आणि त्यांच्याप्रती अपार कृतज्ञता व्यक्त करतो. मी सर्व संबंधितांना विनंती करतो की जोपर्यंत तुमच्या प्रदेशात मातीच्या पुनरुज्जीवनासाठीची धोरणे निर्माण होत नाहीत तोपर्यंत ही मोहीम अशीच चालू ठेवा.

Save Soil
Save Soil : मोटरसायकलवर 26 राष्ट्रांना भेट देऊन सद्गुरु भारतात पोहोचले

तामिळनाडूमध्ये काल प्रवेश केल्यानंतर सदगुरूंनी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत सुलूर एअर फोर्स स्टेशन, कोयंबतूर येथे माती वाचवा कार्यक्रमामध्ये भाग घेतला.

हवाई दलातील कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या श्रोत्यांना व्हिडीओच्या माध्यमातून संबोधित करताना संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी “जगभरात मोठ्या संख्येने लोकांना एका पटात जोडून, एक नवीन पर्यावरण मोहीम निर्माण करत वसुधैव कुटुंबकम (जग एक कुटुंब ) च्या भावनेला जिवंत" करण्याचे श्रेय सद्गुरूंना दिले. केवळ 60 वर्ष पुरेल इतकीच सुपीक माती उरली आहे अशी चिंता संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली आणि मोहिमेचे कौतुक करत ते पुढे म्हणाले, “माती वाचवा मोहीम एक आशेचा किरण आणते आणि ज्या लाखो लोकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे ते आपली माती जतन करण्यासाठी योगदान देतील असा विश्वास निर्माण करते.”

ट्विटरवर, संरक्षण मंत्री म्हणाले, “सुलूरमध्ये ईशा फौंडेशन (@ishafoundation)द्वारे आयोजित 'माती वाचवा' कार्यक्रमाला संबोधित केले. माती वाचवा (#SaveSoil) मोहिमेने मातीशी संबंधित समस्यांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली आहे आणि त्यांना येणाऱ्या काळात मातीचे आरोग्य राखण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे."

सद्गुरूंनी जागतिक स्तरावर नामशेष होण्यापासून माती वाचवण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून मार्चमध्ये एकट्या मोटरसायकल प्रवासाला सुरुवात केली. मोहीम जगभरातील राष्ट्रांना शेतजमिनिवारच्या मातीचे जतन करण्यासाठी त्वरीत कायदा करण्यास आवाहन करत आहे, ज्यापैकी 50% आधीच निकृष्ट आणि उत्पादनास असमर्थ असल्याचे म्हटले जाते. मोहिमेचा उद्देश जगभरातील शेतजमीनिवारच्या मातीत 3-6% सेंद्रिय सामग्री अनिवार्य करण्यासाठी राष्ट्रांना प्रेरित करणे आहे. माती सुपीक आणि उत्पन्नासाठी सक्षम ठेवण्यासाठी आणि तिची वाळू होण्यापासून रोखण्यासाठी ही किमान सेंद्रिय सामग्री आवश्यक आहे.

सद्गुरूंचा मातीसाठीचा प्रवास 21 मार्च रोजी लंडनमध्ये सुरू झाला आणि त्यांनी यामध्ये युरोप, मध्य आशिया आणि मिडल ईस्ट प्रदेशातील 27 राष्ट्रांना भेट दिली. सदगुरूंनी वाळवंटीकरणाशी लढा देण्यासाठी मे महिन्यात आयव्हरी कोस्ट येथे स्थित संयुक्त राष्ट्र परिषदेच्या (UNCCD COP15) 15 व्या सत्रालाही संबोधित केले ज्यात 197 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याच महिन्यात, सद्गुरूंनी दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) येथेही भाषण केले. दोन्ही कार्यक्रमांमध्ये, सद्गुरूंनी राजकीय, व्यावसायिक आणि सांस्कृतिक नेत्यांना पृथ्वीचे जलद वाळवंटीकरण थांबवण्यासाठी तातडीची आणि निर्णायक धोरणात्मक पावले उचलण्याची विनंती केली. UNCCD चा अंदाज आहे की सध्याच्या मातीच्या ऱ्हासाच्या दरानुसार, आतापासून तीन दशकांपेक्षा कमी काळात, म्हणजेच 2050 पर्यंत पृथ्वीचा 90% भागचे वाळवंट बनू शकते.

Save Soil
Save Soil

आजपर्यंत, 74 देशांनी मातीला नष्ट होण्यापासून वाचवण्याचे वचन दिले आहे आणि 8 भारतीय राज्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये माती वाचवण्यासाठी ईशा आउटरीचसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यात गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना , आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी दिल्लीत सद्गुरूंनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मोहिमेसाठी केंद्र सरकारचे समर्थन मागितले. पंतप्रधानांनी माती वाचवण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले आणि या मोहिमेसाठी सरकारच्या मनःपूर्वक पाठिंब्याचे आश्वासन दिले.

कॉन्शियस प्लॅनेट : माती वाचवा, ही माती आणि ही धरती वाचविण्यासाठी एक सजग दृष्टीकोणाची प्रेरणा देणारी जागतिक चळवळ आहे. ही पहिली आणि अग्रगण्य अशी लोक चळवळ आहे. जगातील ३.५ अब्ज लोकांचा पाठींबा मिळवून (जगात मतदानाचा अधिकार असणाऱ्या ६०% लोकसंख्येपेक्षा जास्त) जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मातीचा ऱ्हास थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जागतिक नेते, प्रभावशाली व्यक्ती, कलाकार, शेतकरी, तज्ञ, आध्यात्मिक नेते, NGOs आणि सामान्य जनता, हे पुढे येऊन माती सोबत मानवतेचा संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या मोहिमेला पाठिंबा देत आहेत.

सद्गुरुंचा मातीसाठी केलेला प्रवासाची झलक पाहण्यासाठी savesoil.org येथे क्लिक करा.

Save Soil
Save Soil Movement : 'माती वाचवा' मोहीमेला मुंबईच्या MCGM मुख्यालयाचा पाठिंबा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com