Wine in General Stores
Wine in General StoresTeam Lokshahi

Wine in General Stores: शंभुराज देसाईंना हवी मॉलमध्ये वाईनविक्री; मुद्दा पुन्हा चर्चेत

महाविकास आघाडीच्या काळात झालेला जनरल स्टोर्स किंवा मॉलमध्ये वाईनविक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
Published by :
Vikrant Shinde

महाविकास आघाडी सरकारने 2022 च्या सुरूवातीच्या काळात किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासंदर्भात हा निर्णय अतिशय महत्त्वाचं असल्याचं सांगत महाविकासआघाडी सरकारने हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, भाजप व धार्मिक संघटनांनी हा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही असं सांगत विरोध केला होता. तत्कालीन गृहराज्यमंत्री व आताचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी हा निर्णय शेतकर्यांसाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

Wine in General Stores
Shivsena Dasara Melava 2022: उच्च न्यायालयाने शिवसेनेची मागणी केली मान्य

काय म्हणाले शंभुराज देसाई?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शंभुराज देसाई म्हणाले, "सामान्य लोकांकडून मतं जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जूलैच्या अखेरीस ही सर्व माहिती आमच्याकडे आली. मात्र, आम्ही मंत्रिमंडळ विस्तारात व्यस्त असल्याने काही दिवस त्याकडे दुर्लक्ष झालं. मी माझ्या विभागाला शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या मतांचा एक फॉरमॅट करायला सांगितला आहे. त्याचा अभ्यास करून मग मी यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. माझा अभ्यास पुर्ण झाला की, मी हे सर्व फडणवीस, शिंदेंना विषय समजावेन. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असेल तर, भाजपही विरोध करणार नाही असं मला वाटतंय."

मित्रपक्ष भाजप विरोध करणार का?

महाविकास आघाडीच्या काळात जनरल स्टोर्समध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला होता. त्याकरता भाजपने हा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नसल्याचं भाजपने म्हटलं होतं. त्यामुळे आता भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिंदेगटातील मंत्री शंभुराज देसाई यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं गरजेचं असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com