नशिबाची थट्टा! लाठ्या-काठ्यांचा खेळ करणाऱ्या आजीबाई फसवणुकीमुळे पुन्हा रस्त्यावर

नशिबाची थट्टा! लाठ्या-काठ्यांचा खेळ करणाऱ्या आजीबाई फसवणुकीमुळे पुन्हा रस्त्यावर

एका दिवसात लखपती बनलेल्या आजी पुन्हा सिग्नलवर लाठी-काठी खेळून पैसे मिळवत आहेत.

चंद्रशेखर भांगे | पुणे : रितेश देशमुख, नेहा कक्कर यांसारख्या बॉलीवूड लोकांची मदत मिळालेल्या आणि रस्त्यावर लाठी-काठीचा खेळ खेळून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या शांता पवार आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु, एका दिवसात लखपती बनलेल्या या आजी पुन्हा सिग्नलवर लाठी-काठी खेळून पैसे मिळवत आहेत.

शांता पवार यांचा लाठी-काठी खेळण्याच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. यानंतर बॉलीवूडसह सामाजिक स्तरांवरुन त्यांना लाखो रुपयांची मदत मिळाली आणि आजी लखपती झाल्या होत्या. परंतु, या आजीची दोन मिस्त्रींनी लाखोंची फसवणूक केल्याने त्या पुन्हा रस्तावर आल्या आहेत.

या मिस्त्रीला घर बांधण्याचे काम आजीने दिलं होते. त्या मिस्त्रीने आजीकडून आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे आजी सांगतात. तर, दुसरा मिस्त्री बोलवल्यानंतर त्यानेही साडेसात लाख रुपयांना फसवल्याचे आजी म्हणत आहेत. त्यामुळे या उतार वयात सुद्धा आजींना परत सिग्नलवरती लाठी-काठी खेळून आपल्या पोटाची खळगी भरत आहे.

दरम्यान, शांता पवार या 87 वर्षाच्या आहेत. या आजी हडपसरमध्ये वैदवाडी गोसावी वस्ती येथे राहतात. त्यांची चार मुलं व सुना यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर १७ नातवांची जबाबदारी आली. त्यातील तीन नातवंडांचे आजीने काबाड कष्ट करून लग्नही केलं. आता सध्या त्या १४ नातवांचा सांभाळ करत आहेत. पोट भरण्यासाठी आजी रस्त्यावर लाठी-काठीचा खेळ करतात.

तर, आजीबाईंनी तरूणपणी अनेक चित्रपटांमध्ये सीता और गीता, त्रिशूल व शेरणी या प्रसिध्द चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र लग्नानंतर त्यांनी हा खेळ बंद केला होता. पण नवऱ्याच्या अकस्मात निधनामुळे आजीना हा खेळ पुन्हा सुरू करावा लागला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com