Nana Bhangire & Eknath Shinde
Nana Bhangire & Eknath ShindeTeam Lokshahi

Pune: शिंदे गटाच्या शहराध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; रुग्णालयाच्या प्रस्तावाला परवानगी न देण्याची मागणी

शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली मागणी.
Published by :
Vikrant Shinde

अमोल धर्माधिकारी | पुणे: एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष सोडून मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आपला पक्ष शिवसेनाच असल्याचं सांगत पक्षासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. शिंदेगटाच्या शहराध्यक्षपदी नाना भानगिरे बसले. आता नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी पुण्यातील मनपाच्या एका प्रस्तावित हॉस्पिटलला परवानगी न देण्याची मागणी केली आहे.

Nana Bhangire & Eknath Shinde
"अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदेना सत्ता स्थापनेची विनंती केली होती" अब्दूल सत्तार यांचा खळबळजनक दावा

नेमकं प्रकरण काय?

'पुण्यातील हडपसर भागात मनपानं हॉस्पिटलचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, या हॉस्पिटलला शिवसेनेचा विरोध' असल्याचं शहराध्यक्ष नाना भानगिरेंनी म्हटलं आहे. 'शिवसेनेनं कडाडून विरोध केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी नसल्याचा गैरफायदा घेत या हॉस्पिटलकरता जागा मंजूर केलीट असा आरोपही भानगिरेंनी या पत्रात केला आहे. तर, या बाबी लक्षात घेऊन 'मनपाचा ठराव शासन निर्णयात रद्द करावा' अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com