शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे १०० व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे १०० व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार

Published by :

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. महाराष्ट्रासहित पुण्यातही त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यातल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला आहे.

यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात २० बाय १५ फूटी रांगोळी साकारण्यात आली आहे. तसेच ९९ दिवे प्रज्वलित देखील करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहास प्रेमी मंडळामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com