निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

Published by :

निसार शेख, रत्नागिरी | एसटीच्या संपात सहभागी झाल्याने निलंबित करण्‍यात आलेले राजापूर आगारातील राकेश रमेश बांते (वय-३५) यांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. निलंबनामुळे तणावाखाली येत त्यांनी हे टोकोचे पाऊल उचलले होते. त्यामुळे आता मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार दिला आहे.

राजापूर आगारातील सुमारे २० आणि २५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामध्ये गेली चार वर्षे चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश रमेश बांते यांचाही सामावेश होता. या महिन्याच्या दहा तारखेला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून ते तणावाखाली होते अशी माहिती एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली. अत्यावस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. उपचार सुरु असताना रात्री १०.३० दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचा मृत्‍यू झाला.

राकेश बांते याच्या मृत्युनंतर एसटी कर्मचारी व पत्नीने आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी आगार प्रमुखांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्नी भाग्यश्री बांते यांनी केली आहे. तर बांते यांच्या पत्नी व दोन्ही मुलांच्या संगोपनाबाबत प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना हे निवेदन देण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com