संप सुरू राहिल्यास भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे – अनिल परब

संप सुरू राहिल्यास भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे – अनिल परब

Published by :

दिवाळीच्या आधीपासून सुरू झालेला एसटी कामगारांचा संप सुरूच असून अधिकाधिक व्यापक होत चालला आहे. त्यामुळं राज्यातील सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतरही राज्यभरात कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा कामगारांना आवाहन केलं आहे. अनिल परब यांनी म्हटलं की, हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. हा आदेश जसा आम्हाला लागू, तसा त्यांनाही लागू. यात भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे, असं परब म्हणाले.

त्यांनी म्हटलं की, कारवाई करण्याची इच्छा नाही. संप मागे घ्या, हा संप कोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे. काही राजकीय पक्ष पोळी भाजून घेत आहेत. पडळकर व खोत कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का? जर कामावर नसतील तर पगारही होणार नाही. संप सुरू राहिल्यास कामगारांची अडचण वाढेल, असंही परब म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com