शिक्षिकेचा कुटुंबासोबत थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात मुक्कामी आंदोलन

शिक्षिकेचा कुटुंबासोबत थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात मुक्कामी आंदोलन

Published by :

खालेद नाज, परभणी | 26 महिन्यापासून पगार नसल्यानं शितल अभ्यंकर या शिक्षिकेने तब्बल चोवीस तासापासून थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच मुक्कामी आंदोलन सुरू केला आहे. शितल ह्या परभणी येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.मात्र मागील सव्वीस महिन्यापासून त्यांना त्याचे हक्काच्या पगारापासून वंचित ठेवण्याचा प्रताप परभणीच्या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागाने केला आहे. विशेष म्हणजे विभागीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद, यांच्या निर्णयाला ही शिक्षण विभागाने केराची टोपली दाखवण्याचा काम केला आहे.

विभागीय उपसंचालक यांनी शीतल अभ्यंकर यांना त्वरित त्यांचा पगार अदा करावा असा आदेश दिला होता, मात्र शिक्षण विभागाणे त्यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शितल अभ्यंकर यांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच काल सकाळपासून कुटुंबा सोबत मुक्कामी ठिय्या आंदोलन सुरू केले. शितल यांच्यासोबत त्यांची दिव्यांग मुलगी दीक्षाहि दालनात आई बरोबर ठिय्या आंदोलनात बसली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालन रिकामा करणार नसल्याचं शीतल यांनी पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, शीतल यांनी केलेल्या आंदोलनाची सध्या जिल्हाभर चर्चा असून शिक्षण विभाग यामुळे बॅकफूटवर आलेला आहे. मात्र कॅमेरा समोर बोलायला शिक्षण विभाग अधिकारी तयार नाहीत. त्यामुळे एकूणच मुलांना शिक्षण देण्याचा काम करणाऱ्या शिक्षिकेवर आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात बसून मुक्कामी आंदोलन करण्याची वेळ आली हे दुर्देव म्हणावे लागेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com