एसटी संपावर आज तोडगा निघणार?, मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

एसटी संपावर आज तोडगा निघणार?, मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

Published by :

राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्‍या पंधरा दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. कर्मचारी मागे हटत नसल्‍याने बससेवा पूर्ववत करण्यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी एसटीचे स्‍टेअरिंग हातात घेत गाडी सुरू केली आहे. दरम्यान एसटी कामगारांच्या विरोधातील अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत नेमलेल्या समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत २२ नोव्हेंबरला सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते.

राज्य परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत २२ नोव्हेंबरला सादर करावा. असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे आज इतिवृत्तांत सादर केल्यावर यावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com