ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम पोलिसांनाच पडली महागात! नेमके काय घडले?

ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम पोलिसांनाच पडली महागात! नेमके काय घडले?

टेम्पोने दिली पोलिसांना धडक; दोन पोलीस कर्मचारी जखमी

रिध्देश हातीम | मुंबई : अंधेरी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी रात्री अंधेरी पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईसाठी बंदोबस्त लावला होता. यावेळी ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांच्या अंगावर एकाने गाडी चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या दरम्यान कर्तव्यावर असलेले पोलीस आणि एक रिक्षावाला गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम पोलिसांनाच पडली महागात! नेमके काय घडले?
HSC Result 2023 : बारावीचा निकाल जाहीर, यंदाही निकालात मुलींची बाजी

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एक दीडच्या सुमारास अंधेरी पोलिसांनी अंधेरी पूर्वेकडील कुर्ला अंधेरी रोड नाविक माणसा बारच्या समोर ड्रंक अँड ड्राइव्हची मोहिम हाती घेतली. यात रिक्षा, मोटारसायकल आणि कार यांना थांबवून त्याची तपासणी सुरू होती. त्यावेळी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एक रिक्षा थांबवली. मात्र, त्याचवेळी पाठीमागून वेगात आलेल्या टेम्पोने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षाचा जागी चुराडा झाला. तसेच रिक्षा चालक आणि रिक्षाच्या पुढे उभे असलेले पोलीस शिपाई प्रफुल कुमार, अशोक निकम (वय 41) हे दोघेजण गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी या दोघांनाही जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाला होता. मात्र, अंधेरी पोलिसांनी त्याला पहाटे सहा वाजता अटक केले. सागर हिरालाल गुप्ता (29 वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com