दर्शनासाठी आला अन् दानपेटीतील रक्कम घेऊन पळाला

दर्शनासाठी आला अन् दानपेटीतील रक्कम घेऊन पळाला

राज्यभरात सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील एका मंदिरात चोरट्याने दानपेटीतील रक्कम लंपास केली आहे.

गोपी व्यास | वाशिम : राज्यभरात सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. दिवाळीत अनेक जण मंदिरात देवाकडे सुख समृद्धी मागण्यासाठी जात असतात. मात्र, वाशिम जिल्ह्यातील एका मंदिरात चोरट्याने दानपेटीतील रक्कम लंपास केली आहे. दानपेटीत अंदाजे पन्नास हजारापेक्षा अधिक रक्कम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. दानपेटी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्याचा तपास करत आहेत.

दर्शनासाठी आला अन् दानपेटीतील रक्कम घेऊन पळाला
बलात्कारानंतर मुलीला जिवंत सोडणे हा आरोपीचा दयाळूपणा; हायकोर्टाची वादग्रस्त टीप्पणी

वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथील संत गजानन महाराज मंदिरात शनिवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. चोरट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मंदिरात घुसून तेथील दानपेटीतील रक्कम चोरून नेली. दानपेटीत अंदाजे पन्नास हजारापेक्षा अधिक रक्कम होती. या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशमनध्ये नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दानपेटी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

आधी दर्शनाला येऊन केली पाहणी

दानपेटीतील रक्कम पळवणाऱ्या चोरट्याने काही दिवसांआधी मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने येऊन मंदिर परिसराची पाहणी केली होती. रात्री मंदिरात कुणीही नसल्याची संधी साधत दानपेटी फोडून ही रक्कम चोरून नेली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com