भावना गवळी यांना ED चं तिसरे समन्स, 17 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी

भावना गवळी यांना ED चं तिसरे समन्स, 17 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी

Published by :

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने तिसरं समन्स बजावलं आहे. भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे.

भावना गवळी यांना 24 नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्यास या समन्सद्वारे सांगण्यात आलं आहे. एएनआयनं या संदर्भात ट्विट केलं आहे. ईडीनं भावना गवळी यांना यापूर्वी दोन समन्स पाठवली होती. मात्र, त्यावेळी भावना गवळी ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाल्या नाहीत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com