Pune Breaking
Pune BreakingTeam Lokshahi

छेडछाडीला कंटाळून महिलेने कापले तरुणाचे लिंग

धक्कादायक ! पुण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने छेडछाडीला कंटाळून तरुणाचे लिंग कापले. याप्रकरणी तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. यातील पूनम वाडकर या महिला आरोपीसह इतर तीन अज्ञात आरोपींना पोलिसांनी अटक कले आहे. फिर्यादीचे नाव तरुणाचे नाव विनायक तानाजी लोंढे असे आहे. तर, पूनम वाडकर ही कुख्यात गुंड निलेश वाडकरची पत्नी असल्याचे समोर येत आहे.

कुख्यात गुंड निलेश वाडकर याचा काही वर्षांपूर्वी खून झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी पुनम वाडकर ही बचत गटामध्ये काम करत असे. यावेळी फिर्यादी विनायक लोंढे याची कर्ज देण्याच्या बहाण्याने पूनम समवेत त्याची ओळख झाली होती. या ओळखी नंतर पूनमला फिर्यादी लोंढे व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज करत होता.

Pune Breaking
वेश बदलून मुंबई पोलिसांनी उघडा पाडला दरोडेखोरांचा डाव

फिर्यादी विनायक लोंढे यांच्या व्हॉट्सअपवरील अश्लील मेसेजला कंटाळून पूनमने आपल्या इतर तीन साथीदाराला सांगून त्याला भेटण्यास कात्रज जवळील स्वामीनारायण मंदिराजवळ बोलावले. त्यानंतर त्याला दुचाकीवर बसून कात्रज बोगद्याजवळ नेत असताना त्याचे लिंग कापण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com