Ips Officer Transfer
Ips Officer Transfer Team Lokshahi

राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' अधिकाऱ्यांना मिळाली बढती

15 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तर 6 अधिकारी पदाच्या प्रतीक्षेत

राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आला आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांचीही बदली, नागरे पाटील यांना एसीबीच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बढती. तर मीरा भाईदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना राज्याच्या दहशतवादीविरोधी विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलंय.

Ips Officer Transfer
"वेगळ्या प्रकारचा पवार दिसतोय" नितेश राणेंची रोहित पवारांवर विखारी टीका

यासोबतच मिलिंद भारंबे नवी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली करत त्यांना राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलंय.अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांचीही बदली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली करून त्यांच्याजागी विनयकुमार चौबे यांना नेमण्यात आलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com