Navi Mumbai Car accident
Navi Mumbai Car accident team lokshahi

कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यु, एकाची प्रकृती गंभीर

पामबीचवरील भीषण अपघातामध्ये कारचा चक्काचूरb

नवी मुंबई | हर्षल भदाने पाटील : नवी मुंबईतील (navi mumbai) पामबीच मार्गावर (Palm Beach) अक्षर चौकालगत भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली. यामध्ये नितीन मॅथ्यू आणि व हर्षल या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये दुभाजकाचे रेलिंग, पामची झाडे व विजेचा खांब देखील तुटला.

बुधवारी वाशीकडून (vashi) बेलापूरकडे (belapur) जाणाऱ्या कारसोबत हा अपघात घडला. सानपाडा येथे राहणारा तरुण नितीन मॅथ्यू हा मित्र श्रेयस ठोसर व हर्षल यांच्यासोबत बेलापूरच्या दिशेने चालला होता. पामबीच मार्गाने ते जात असताना त्यांची कार अति वेगात होती. त्यामुळे अक्षर चौकालगत चालक नितीन मॅथ्यू याचे कारवरील नियंत्रण सुटले व ती दोन मार्गामधील दुभाजकाच्या रेलिंगला धडकली. यावेळी प्रत्यक्षदर्शीनी तत्काळ दोघांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. मात्र कारच्या मागील बाजूस बसलेला श्रेयस ठोसर कार चेपल्याने अडकला होता.

त्याच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाने धाव घेऊन कारचा काही भाग कापून त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच एनआरआय पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या अपघातामध्ये चालक नितीन मॅथ्यू याचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षल याचे दोन्ही पाय तुटल्याने उपचार सुरू असताना पहाटे ५ वाजता त्याचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या श्रेयस ठोसर गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कारचालक नितीन विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com