अखेर ठाण्यातील वादग्रस्त सहायक आयुक्तांचा कार्यभार काढला; उदय सामंतांची सभागृहात घोषणा

अखेर ठाण्यातील वादग्रस्त सहायक आयुक्तांचा कार्यभार काढला; उदय सामंतांची सभागृहात घोषणा

विरोधकांकडून मांडण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सामंत यांची घोषणा

मुंबई : : ठाणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी अखेर महेश अहिर यांचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. विधान परिषदेत मंत्री उदय सामंत यांची सभागृहात घोषणा केली आहे. वादग्रस्त ऑडिओ क्लिप, डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी आदी प्रकरणी त्यांची सीआयडीमार्फत चौकशी सुरु आहे.

अखेर ठाण्यातील वादग्रस्त सहायक आयुक्तांचा कार्यभार काढला; उदय सामंतांची सभागृहात घोषणा
मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत हलविणार? फडणवीसांनी दिले उत्तर

महेश अहिर यांच्यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा कुटुंबीयांना जीवे मारण्याचा प्लॅन केल्याचा आरोप होता. तसेच, सदनिका भ्रष्टाचार, दहावी-बारावी प्रमाणपत्र, ट्विटरवरील पैशांचा व्हिडीओ याबाबतची चौकशीही सुरु आहे.

यासंबंधी आज सभागृहात अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला. महेश अहिर हा माणूस दोन वेळा निलंबित आहे. तरी याला चांगल्या ठिकाणी नियुक्ती मिळते. एका व्हायरल क्लिपमध्ये मी टाईट होऊन मुख्यमंत्र्यांना फोन लावला होता. मुख्यमंत्र्यांनी ते काम करून टाकतो म्हणाले. या अधिकाऱ्याला इतके वर्ष ठाण्यातच नियुक्ती कशी मिळाली? याला आपण तात्काळ निलंबित करणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

यावर उदय सामंत यांनी उत्तर देताना म्हणाले की, संबधित अधिकाऱ्याचे ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्यात जे काही आरोप आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहे. या प्रकरणाची चौकशी 30 दिवसात पुर्ण करुन योग्य ती कारवाई केली जाईल. ठाण्याचे व्यक्ती आहे म्हणून इतरांना गोवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही असे म्हणत ठाणे मनपा अधिकारी महेश आहेर यांचा कार्यभार काढल्याची घोषणा त्यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com