uddhav thackeray
uddhav thackeray Team Lokshahi

तुम्ही मला हवे आहात; उध्दव ठाकरेंची सुभाष देसाई, रावते यांना भावनिक साद

Uddhav Thackeray : विधान परिषदेची उमेदवारी नाही दिली. तरीही थोडीही धूसफूस राग न सुभा ष देसाई आणि दिवाकर रावते येथे आले आहेत. बाळासाहेवांनी जी-जी जबाबदारी दिली. ती त्यांनी पार पडली.

मुंबई : विधान परिषदेत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दिवकर रावते यांना उमेदवारी दिली नाही. दोघेही निवृत्त होत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर आज शिवसेना अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोघांना मी कधी निवृत्त होऊ देणार नाही, शिवसेनेच्या कामासाठी तुम्ही मला हवे आहात, अशी भावनिक सादच त्यांना घातली आहे. शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त ते आज बोलत होते.

उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसेना अनेक शतके राहणार आहेत. आपल्याकडे अनेक श्रध्दा-अंधश्रध्दा आहे. पण माझा त्यावर विश्वास नाही. कारण माझा पक्ष पितृपक्ष आहे. माझ्या पिताने पक्ष स्थापन केला आहे. माझ वय जेमतेम सहा वर्ष शिवसेनेचा नारळ फुटला. त्या नाराळाचे पाणी माझ्या अंगावर उडाले होते. तेव्हा वाटले नव्हते ते शितोंडे मला एवढे भिजवतील. वय लहान होतं, उत्साह होता. पण, जबाबदारी किती मोठी आहे, हे आता कळले. शिवसेनाप्रमुखानंतर शिवसेनेचे काय याचे सक्षमपणे उत्तर आपण दिले आहे.

विधान परिषदेची उमेदवारी नाही दिली. तरीही थोडीही धूसफूस राग न सुभाष देसाई आणि दिवाकर रावते येथे आले आहेत. बाळासाहेवांनी जी-जी जबाबदारी दिली. ती त्यांनी पार पडली.

आणीबाणीच्या काळात मार्मिकचे अंक हे रावते यांनी अक्षरश: हातगाडीवर घेऊन विकले होते, असे हे रावते आहे. मार्मिक आपण दैनिक स्वरुपात काढणार असं ठरलं होतं. त्यावेळी मी बाळासाहेबांकडे दैनिकाची जबाबदारी मागितली. त्यावेळी तुमच्या टीममधला एक माणूसही मागितलेला. त्यानंतर बाळासाहेबांनी सुभाष देसाई यांना फोन करून माझ्यासोबत काम करण्यास सांगितलं. तेव्हापासून देसाई माझ्यासोबत आहे. दोघेही नेते माझ्यापेक्षा वयांनी मोठे आहात. दोघांना मी कधी निवृत्त होऊ देणार नाही, शिवसेनेच्या कामासाठी तुम्ही मला हवे आहात, अशी सादही उद्धव ठाकरेंनी घातली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com