कुणी कितीही बदनामी केली तरी बेचैन होऊ नका…, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना सल्ला

कुणी कितीही बदनामी केली तरी बेचैन होऊ नका…, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना सल्ला

Published by :

लोकशाही न्यूज नेटवर्क

कुणी कितीही बदनामी केली तरी, बेचैन होऊ नका, त्यांचा बुरखा तुम्ही फाडला आहे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिला. याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुशांतसिंह राजपूत मृत्यू तसेच कंगना रणौत प्रकरणांवरून पोलिसांवर टीका करणाऱ्यांचा अप्रत्यक्षपणे खरपूस समाचार घेतला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचे तसेच पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन केले. या कार्यक्रमात ९४ पोलीस ठाण्यांतील स्वागत कक्षाचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तुमचा अभिमान राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्राला आहे. सरकार म्हणून ताकतीने तुमच्या मागे उभे आहे, असा विश्वास त्यांनी पोलिसांना दिला. कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हा देखील एक प्रकारचा व्हायरस आहे आणि त्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकार म्हणून ताकतीने तुमच्या मागे उभे आहे. यावेळी पोलिसांच्या घराचा प्रश्न देखील संपूर्णत: मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, यासाठीचे आवश्यक असणारे प्रस्ताव समोर आणा, आपण त्याला मंजूरी देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com