मुंबई लोकल पुन्हा बंद होणार?

मुंबई लोकल पुन्हा बंद होणार?

Published by :

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावतीमध्ये वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि मुंबई, पुण्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं, अशी माहिती आहे.

येत्या काही दिवसात कोरोनास्थितीचा आढावा घेऊन याबाबत प्रशासन निर्णय घेणार आहे. प्रवासाच्या वेळा कमी करण्यात येतील किंवा पूर्णपणे प्रवासावर बंदी घालण्यात येईल. अन्यथा आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासास मुभा दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येणार आहे.

आम्ही सर्वसामान्यांसाठी रेल्वेची दारं बंद करणार नाही तर वेळांमध्ये काही बदल होऊ शकतो, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. कोरोनामुळे गेल्या १० महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील लोकल सेवा 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्यात आली होती. सर्वसामान्य लोकांसाठी सकाळी सकाळी ७, दुपारी 12 ते 4 आणि रात्री ९ याकाळात प्रवासास मुभा देण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com