अंगणात झोपलेल्या महिलेला वाघाने उचललं अन्...

अंगणात झोपलेल्या महिलेला वाघाने उचललं अन्...

चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव-मानव संघर्षाने अतिशय टोक गाठला आहे.

अनिल ठाकरे | चंद्रपूर : चंद्रपुरात उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे. नैसर्गिक थंड हवेसाठी ग्रामीण भागात अंगणात गावकरी झोपतात. अशीच एक महिला अंगणात झोपली होती. मात्र, तिची ही झोप शेवटची ठरली. झोपेत असताना वाघाने झेप घेतली. तिला खाटेवरून उचललं. व तिला जंगलाचा दिशेने वाघ घेऊन निघाला. ही थरारक घटना सावली तालुक्यातील विरखल चख येथे घडली. मंदाबाई एकनाथ सिडाम असे मृतक महिलेचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

अंगणात झोपलेल्या महिलेला वाघाने उचललं अन्...
अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; बायको नाराज झाली तर घर सोडून जाते का?

जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील विरखल चक येथील मंदाबाई एकनाथ सिडाम (वय 53) ही महिला अंगणात खाटेवर झोपली होती. रात्रीच्या दरम्यान वाघाने झोपलेल्या मंदाबाई यांच्यावर झेप घेतली. व तिला ओढत ओढत वाघ जंगलाच्या दिशेने नेत होता. याच दरम्यान काही गावाकऱ्यांनी हे दृश्य बघितलं. त्यांनी आरडाओरड सुरू करत धाव घेतली. हे पाहताच वाघाने तिला सोडून जंगलाच्या दिशेने धाव घेतली. यात मंदाबाईचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती सावली वनपरिक्षेत्र व पाथरी पोलिसांना देण्यात आली. दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वनविभागाने मृतकाचा परिवाराला 25 हजारांची मदत केली.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्याची ओळख वाघांचा जिल्हा अशी आहे. दरवर्षी वाघ बघण्यासाठी ताडोबात लाखो देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावतात. जिल्ह्यातील वाघांची संख्या सुखावणारी ठरली आहे. ही एक बाजू चांगली आहे. दुसरी बाजू मात्र भयावह आहे. जिल्ह्यात वन्यजीव-मानव संघर्षाने अतिशय टोक गाठला आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात दोन दिवसात एक बळी चालला आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाय-योजनांची गरज आहे. मात्र, हा संघर्ष टाळण्यासाठी अद्यापही ठोस पाऊल उचलल्या गेलं नाही ही मोठी शोकांतिका असल्याते ग्रामस्थांचे म्हणणं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com