महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आज वरळी बंदची हाक

महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आज वरळी बंदची हाक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आज वरळी बंदची हाक देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आज वरळी बंदची हाक देण्यात आली आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी ७:०० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे. त्यामुळे पुण्यानंतर आता मुंबईच्या वरळी परिसरात बंदची हाक देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

वरळी परिसर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे या वरळी बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केल्यास आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आज वरळी बंदची हाक
महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उद्या वरळी बंदची हाक

या बंदच्या पार्श्वभूमीवर वरळीकरांकडून बंदचे पोस्टर्स सध्या व्हायरल केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच, महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याच्या अनेक भागांत आंदोलने केली जात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com