गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा तरुणांची हुल्लडबाजी; पोलिसांचा लाठीचार्ज

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा तरुणांची हुल्लडबाजी; पोलिसांचा लाठीचार्ज

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांच्या हुल्लडबाजीचे प्रकार आता वाढत आहेत

अमोल धर्माधिकारी | सोलापूर : गौतमी पाटीलला ओळखत नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी सापडणं कठीण आहे. कारण लहानांपासून तर साठीला टेकलेल्या म्हाताऱ्यानं सुद्धा गौतमीचा डान्स पाहिलाय. सुरुवातीला आक्षेपार्ह डान्समुळं ती चर्चेत आली. त्यानंतर तीला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळाली. परंतु, तिच्या कार्यक्रमात तरुणांच्या हुल्लडबाजीचे प्रकार आता वाढत आहे. असाच प्रकार सोलापूरमधील वेळापूर तालुक्यात समोर आला आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा तरुणांची हुल्लडबाजी; पोलिसांचा लाठीचार्ज
तीन गाण्यांसाठी तीन लाख? इंदुरीकर महाराजांच्या आरोपावर गौतमी पाटीलने स्पष्टच सांगितले

सोलापूरातील वेळापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांची हुल्लडबाजी करत मोठा गोंधळ घातला. या हुल्लडबाजांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. परुतं, यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात व्यत्यय आला होता. यानंतर पुन्हा एकदा कार्यक्रम सुरु करण्यात आला.

दरम्यान, किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी तीन गाणे वाजवून तिला तीन लाख मिळतात, अशी टीका गौतमी पाटीलवर केली होती. याबाबत गौतमीला विचारले असता इंदूरीकर महाराज जे बोलतात तीन लाख रुपये खूपच म्हणतात तेही तीन गाण्यांना. एवढं मानधन मी घेत नाही, असा खुलासा तिने केला. तसेच, आगामी घुंगरू चित्रपटातून गौतमी पाटील मनोरंजन सृष्टीत प्रवेश करणार आहे. नृत्यांगनेच्या जीवनावर आधारित तिने या चित्रपटात भूमिका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com