महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल; अजित पवारांनी सांगितली 'मन की बात'

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल; अजित पवारांनी सांगितली 'मन की बात'

पुण्यात एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी हे विधान केले आहे. यामुळे राज्यात राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

पुणे : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पुण्यात एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी हे विधान केले आहे. यामुळे राज्यात राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल; अजित पवारांनी सांगितली 'मन की बात'
एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितलं की माझे मिस्टर...; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

अजित पवार म्हणाले की, 2024 ची वाट कशाला बघू. मी आतादेखील राज्याचा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या दोन्हीसोबत मी काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत वरिष्ठांनी सांगितले म्हणून काम केले, असेही त्यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. पण प्रत्येक वेळी एकतर आमच्या जागा कमी आल्या. किंवा मुख्यमंत्रिपदाची संधी असताना वरिष्ठ पातळीवर काही वेगळा निर्णय झाला आणि ती संधी गमावली, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.

दरम्यान, माझा आजचा कार्यक्रम पूर्वनियोजितच होता. हा कार्यक्रम अडीच महिन्यांपूर्वीच ठरला होता. त्यामुळेच मी मुंबईच्या पक्षाच्या शिबिराला हजर राहू शकलो नाही. पण, उगीच संभ्रम निर्माण केला जातो. माझ्यावर का एवढं प्रेम ओतू चाललंय काय माहित? इथे प्रेम ओतू घालावण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या विचाराचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्या, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com