'50 खोके...' पडणार महागात? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊतांना न्यायालयाचे समन्स

'50 खोके...' पडणार महागात? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊतांना न्यायालयाचे समन्स

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊतांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून समन्स बाजवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेसंजय राऊतांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून समन्स बाजवण्यात आले आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटावर मानहानीचा दावा केला होता. यावर सुनावणी करताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊतांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याची पुढील सुनावणी 17 एप्रिल रोजी होणार आहे.

'50 खोके...' पडणार महागात? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊतांना न्यायालयाचे समन्स
फडणवीसांच्या मदतीनेच शिवसेनेत बंड; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

खोके, गद्दार, एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह कित्येत रुपयांना विकत घेतल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत होता. याविरोधात राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊतांविरोधात दोन हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता.

यावर सुनावणी करताना न्यायालयाने सोशल मीडियावरचा मजकूर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, स्वतः न्यायालयात हजर राहून उत्तर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याप्रकरणी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊतांना समन्सही बजावण्यात आले आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये उद्धव ठाकरेंना कोर्टात हजर राहावं लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com