संभाजी भिडेंच्या विरुद्ध आज पुण्याच्या न्यायालयात केस दाखल होणार

संभाजी भिडेंच्या विरुद्ध आज पुण्याच्या न्यायालयात केस दाखल होणार

संभाजी भिडेंच्या विरुद्ध आज पुण्याच्या न्यायालयात केस दाखल होणार
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

महात्मा गांधी, महात्मा फुले आणि इतर अनेक राष्ट्रपुरुष यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात आज सकाळी 11 वाजता पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी केस दाखल करण्यासाठी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यासह डॉ कुमार सप्तर्षी, डॉ विश्वमभर चौधरी,अन्वर राजन हे सकाळी 11 वाजता न्यायालयात जाणार आहेत.

डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर ही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता संभाजी भिडे तसेच डेक्कन पोलीस निरीक्षक व पुणे पोलीस आयुक्त यांच्याविरुद्ध ॲड. असीम सरोदे यांच्यामदतीने तुषार गांधी व इतर विचारवंत थेट न्यायालयात केस दाखल करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com