सहा वर्षीय चिमुकल्याचे कृषीमंत्र्यांना भावनिक पत्र म्हणाला...

सहा वर्षीय चिमुकल्याचे कृषीमंत्र्यांना भावनिक पत्र म्हणाला...

रुद्र विजय शेंडगे या सहा वर्षीय चिमुकल्याने आपल्या पत्राच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गोपाल व्यास, वाशिम

रुद्र विजय शेंडगे या सहा वर्षीय चिमुकल्याने आपल्या पत्राच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिले आहे. सरकारी कार्यालयात पैसे दिल्यावरच काम होते असा व्हिडिओ चिमुकल्याने मोबाईलवर पाहिल्यानंतर हे पत्र त्याने लिहिलं आहे.

या पत्रात त्याने लिहिलं आहे की, प्रति कृषी मंत्री साहेब...काल माझ्या पप्पा च्या मोबाईल वर पाहीलं की , पार्टी दिली की सरकारी लोक काम करतात मग आम्ही तुम्हाला गल्ला फोडुन त्यातील पैश्याची पार्टी देतो आमचे पप्पा पोळा झाला लक्ष्मी झाल्या गणपती झाले परंतु पप्पा रात्रंदिवस वावरात आहेत. मी त्यांना फोन करून विचारलं पप्पा घरी कधी येणार तर पप्पांनी सांगितलं आपल्या वावरात जंगलातील रोही वानर सोयाबीन खातात. त्यामुळे मी घरी येणार नाही साहेब, तुम्हाला पार्टी देतो आमच्या वावरातील रोही वानरचा बंदोबस्त करा त्यांना आमच्या वावरात येऊ देऊ नका मग माझे पप्पा घरी येतील.

सरकारी लोक पार्टी घेऊन योजना देतात मग आमच्या पण सोयाबीनला भाव द्या, पिक विमा द्या कर्ज पण माफ करा मी तुम्हाला पार्टी देतो. माझ्या गल्यातले पैसे घेऊन तुम्हाला पार्टी देतो साहेब. असे या मुलाने भावनिक पत्र लिहिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com