सिध्देश्वर अर्बन बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचा दणदणीत विजय
अनिल साबळे | औरंगाबाद : सिल्लोड येथे अतिप्रतिष्ठेची सिध्देश्वर अर्बन बँकेच्या निवडणुकीत प्रभाकर पालोदकर व भाजपा पुरस्कृत सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. पॅनलच्या सर्व 13 उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. तर, मुर्डेश्वर पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.
सिल्लोड येथे सिद्धेश्वर अर्बन सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणीत प्रभाकरराव पालोदकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. सिल्लोड निवडणुकीमध्ये सिल्लोड येथील भाजपा पुरस्कृत उमेदवार प्रभाकर पालोदकर सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. या पॅनलचे सर्व 13 उमेदवार दणदणीत मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच समविचारी संघटनांनी ही प्रभाकर पलोडकर पॅनलला पाठिंबा दिला होता. या विजयाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावर भव्य अशी मिरवणूक काढून शहरात प्रचंड जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
सिल्लोड मतदार संघातील विरोधकांना राजीनाम्याची अपेक्षा होती, असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले की, मतदार संघातील माझे विरोधक गेल्या 25 वर्षांपासून आपले देव पाण्यात ठेवून बसले आहे. मात्र, त्याच्या मनात खोटं असल्याने देव त्यांना पावत नाही. मी सत्याने काम करत असल्याने देव मला साथ देतो, असे सत्तार यांनी म्हंटले आहे.