Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांची 'या' दिवशी होणार मुंबईत सभा

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांची 'या' दिवशी होणार मुंबईत सभा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाही आहेत. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत असतात. राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांची येत्या 6 जानेवारी रोजी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहे. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

गिरगाव येथे विभाग क्रमांक 12 ने आदित्य ठाकरे यांच्या सभेच आयोजन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे हे खासदार अरविंद सावंत यांचा प्रचारासाठी मैदानात उतरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आदित्य यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com