आप आमदाराला कार्यकर्त्यांकडून मारहाण; सभेतून काढावा लागला पळ

आप आमदाराला कार्यकर्त्यांकडून मारहाण; सभेतून काढावा लागला पळ

आम आदमी पक्षाच्या आमदाराला त्यांच्याच कार्यकर्त्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या आमदाराला त्यांच्याच कार्यकर्त्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुलाब सिंह यादव असे नाव असून आम आदमी पक्षाकडून मटियालाचे मतदासंघाचे आमदार आहेत. हा व्हिडीओवरुन भाजपने आपवर निशाणा साधला आहे.

आप आमदाराला कार्यकर्त्यांकडून मारहाण; सभेतून काढावा लागला पळ
नवले पुलाजवळील अपघातप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास आमदार श्याम विहार येथे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत होते. सभेदरम्यान वाद झाला आणि कार्यकर्त्यांनी आमदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. आमदार स्वतःला वाचवण्यासाठी सभेच्या ठिकाणाहून पळत आहेत तर काही लोक त्यांचा पाठलाग करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भारतीय जनता पक्षाने आम आदमी पार्टीवर तिकीट विकल्याचा आरोप केला आहे. या मुद्द्यावर आम आदमी पक्षाकडून अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

तर, आमदार गुलाब यादव यांनी या संपूर्ण घटनेवर ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, भाजप हतबल झाला आहे आणि भाजपची तिकिटे विकल्याचा बिनबुडाचा आरोप करत आहे. मी सध्या चव्हाळा पोलिस स्टेशनमध्ये असून भाजपचे नगरसेवक आणि या प्रभागातील भाजपचे नगरसेवक कथित कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर आहे. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

आप आमदाराला कार्यकर्त्यांकडून मारहाण; सभेतून काढावा लागला पळ
Indonesia Earthquake : इंडोनेशिया भूकंपामुळे हादरले, 162 जणांचा मृत्यू
Lokshahi Marathi
www.lokshahi.com