Devendra Fadnavis : मेट्रो कारशेड आरेच्या ठिकाणीच होणार, पण...

Devendra Fadnavis : मेट्रो कारशेड आरेच्या ठिकाणीच होणार, पण...

आरे आंदोलन तापले, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णयावर ठाम

मुंबई : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कांजूरमार्गऐवजी आरे कॉलनीत मेट्रो-3 लाईन कारशेड बांधण्याचे निर्देश दिले. यावरुन पुन्हा आता आरे आंदोलन तापले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णयावर ठाम असून मेट्रो कारशेड आरेच्या ठिकाणीच होणार असल्याचे म्हंटले आहे. मात्र, या कारशेडसाठी नव्याने एकही झाड कापणार नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Devendra Fadnavis : मेट्रो कारशेड आरेच्या ठिकाणीच होणार, पण...
Ajit Pawar : शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं तर उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं

देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले, मेट्रो कारशेड आरेच्या ठिकाणीच होणार आहे. परंतु, या कारशेडसाठी नव्याने एकही झाड कापणार नाही. मविआने जंगल म्हणून घोषित केलेल्या जागेतही बदल करणार नाही. वन म्हणून राखीव ठेवलेली जमीन कारशेडसाठी वापरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पर्यावरणवाद्यांचा मी सन्मान करतो. मात्र, आरे संदर्भातील काही विरोध हा स्पॉन्सर्ड आहे. आरे येथील मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला घेऊन गेल्यास प्रकल्प खर्च प्रचंड वाढेल. पुढील चार वर्ष त्या ठिकाणी बांधकाम करण्यास वेळ खर्च करावा लागेल. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड, असा हा प्रकल्प ठरेल, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

मागील सरकारने वनसंरक्षित जमीन घोषित केली असली तरी उरलेल्या जमिनीमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या संरचनेमध्ये अर्थात डिझाईनमध्ये बदल केला जाईल. मागील सर्वांचे सरसकट निर्णय अवलोकन करणार नाही. जे निर्णय कुहेतूने घेतलेत त्यात बदल केला जाईल किंवा रद्द केले जातील.

तसेच, उद्याचा विश्वासदर्शक ठराव आम्ही बहुमताने पारित करू. आमचे दोन आमदार आजारी असल्यामुळे आज येऊ शकले नाहीत. तरीही आमचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार १६४ मते घेऊन विजयी झाले, असे त्यांनी म्हंटले आहे.

ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरियल डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घाईने काम सुरू असून लवकरच सर्वेक्षणात अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com