'मी लोकल गाडी आहे, हात दाखवा कुठेही थांबवा'

'मी लोकल गाडी आहे, हात दाखवा कुठेही थांबवा'

अब्दुल सत्तार आज नागपूर दौऱ्यावर असून शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहेत.

कल्पना नालस्कर|नागपूर : मी लोकल गाडी आहे, हात दाखवा कुठेही थांबवा. शेतकऱ्यांचा फायदा ज्याच्यात होईल ते करण्यात मी कुठेही कमी पडणार नाही, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे. अब्दुल सत्तार आज नागपूर दौऱ्यावर असून शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा फायदा ज्यामध्येही असेल ते करण्यात मला काही इगो नाही. मी लोकल गाडी आहे, हात दाखवा कुठेही थांबवा. शेतकऱ्यांचा फायदा ज्याच्यात होईल ते करण्यात मी कुठेही कमी पडणार नाही, असे सत्तारांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश आहे की शेतकऱ्यांशी भेटा-चर्चा करा आणि त्यांच्या वेदना समजून घ्या, त्याची सुरुवात मी आढावा घेऊन केली आहे. आता तीन दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाडा विभागात जाणार आहे. यासंदर्भात सोमवारी अधिवेशनात बोलेल, अशी माहितीही अब्दुल सत्तार यांनी सांगितली.

तर, शरद पवार हे देशातले कृषिमंत्री राहिले आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्यायला मला काही हरकत नाही. शरद पवारांसारखे नेत्याचं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळाले तर चांगलेच आहे. राज्यपाल महोदयांनी सुद्धा शेतकऱ्यांसोबत काम केले आहे. तेही तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडेही मी आणि कृषी विभागाचा सचिव जाऊन मार्गदर्शन घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Lokshahi
www.lokshahi.com