संजय राऊतांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?

संजय राऊतांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?

संजय राऊत यांच्या आरोपांवर अब्दुल सत्तार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. सत्तारांनी एका सैनिकाची जागा बळकावल्याचा दावा राऊतांनी ट्विटद्वारे केला होता. याप्रकरणावर आता अब्दुल सत्तार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांच्या अध्यक्षतेखाली प्लॉट शोधण्यासाठी समिती नेमा, अशी मागणीच सत्तारांनी केली आहे.

संजय राऊतांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?
Manisha Kayande : मनिषा कायंदेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कारवाई

अब्दुल सत्तार म्हणाले की, आतापर्यंतच्या राजकारणात ४० ते५० वेळेस असे आरोप माझ्यावर झाले आहेत. तेथे संस्थेच्या मार्फत सुसज्ज असे रुग्णालय बांधत आहे. माझी तिथे ६० एकर जमीन आहे. मग मी ३० बाय ४० जागा कशाला घेऊ. मी स्वतः जमीन दान केलेली आहे. तुम्हाला दान द्यायची असेल तर द्या. तुम्हाला जमीन जर द्यायची असेल तर संजय राऊत यांच्याकडे जाऊन सौदा करा. सिल्लोड मधील झोपडपट्टीच्या बाजूचा तो प्लॉट आहेत. ती जागा काही नरिमन पॉईंटची जागा नाही, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे.

मी सामाजिक काम करीत आहेत, हॉस्पिटल बांधत आहे. अडथळे आणू नका, अशी विनंतीही त्यांनी केली. पुढे निवडणुका आहेत त्यात प्रचार करा मी किती खाले, मी किती हडप केलं मग माहिती पडेल. त्या सैनिकाचं प्लॉट शोधण्यासाठी आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमा, असं आव्हानच अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

काय आहे संजय राऊतांचा आरोप?

सिल्लोड येथे मेडिकल कॉलेजच्या उभारणीकरता जमीन हस्तांतरण प्रक्रिया अब्दुल सत्तारांनी सुरू केली आहे. या जागेवर एका जवानाचीही जमीन आहे. त्यांच्याकडून अनधिकृतरित्या जमीन बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे वृत्त समोर येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही प्राप्त झाली आहे. याच पत्राचा दाखला देत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलं आहे.दे.भ. देवेंद्रजी, हे खरे आहे? औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू. आधी या औरंग्याच्या पेकाटात लाथ घाला. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची लूट सुरू आहे. काय करताय बोला? असा थेट सवाल संजय राऊतांनी फडणवीसांना विचारला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com