शरद पवारांसारखे नेत्याचं मार्गदर्शन मिळाले...: अब्दुल सत्तार

शरद पवारांसारखे नेत्याचं मार्गदर्शन मिळाले...: अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.

कल्पना नालस्कर | नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार हे देशातले कृषिमंत्री राहिले आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्यायला मला काही हरकत नाही. शरद पवारांसारखे नेत्याचं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळाले तर चांगलेच आहे, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे. अब्दुल सत्तार आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.

अब्दुल सत्तार म्हणाले की, कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे कलेक्टर-कमिशनर हे दोन्ही अधिकारी एक दिवस एका गावात जाऊन शेतकऱ्यांची दिनचर्या समजून घेतली, किती घाम गाळतो, किती रक्त जाळतो यावर ते चिंतन करतील. व आम्ही पण ते चिंतन शिकू. हे सर्व आम्ही एक दिवस सोबत राहून शिकू, असा निर्धार त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडेल की कृषिमंत्री एक दिवस त्या बांधावर जाऊन राहील. आम्हाला शेतकऱ्यांपासून शिकायला मिळेल, त्यांच्या अडचणी काय समजतील व त्यावर उपाययोजना काय करायचं हेही माहित पडेल, याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. मी स्वतः मंत्री म्हणून सर्व जिल्हे फिरणार आहे, अशी योजना लवकरच आणणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

शरद पवार हे देशाचे कृषिमंत्री राहिले आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्यायला मला काही हरकत नाही. शरद पवारांसारखे नेत्याचे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळाले तर चांगलेच आहे. राज्यपाल महोदयांनी सुद्धा शेतकऱ्यांसोबत काम केले आहे. तेही तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडेही मी आणि कृषी विभागाचा सचिव जाऊन मार्गदर्शन घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Lokshahi
www.lokshahi.com