बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले विधानसभेला लढवणार

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले विधानसभेला लढवणार

सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.

प्रशांत जगताप | सातारा : सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मुख्य लढत महाविकास आघाडी विरुध्द भाजप-शिंदे गट होणार आहे. परंतु, जागावाटपावरुन या दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही विधानसभेत कंबर कसली आहे. विधानसभेला 288 जागा लढवणार असल्याचा निर्धार अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.

बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी विधानसभेला 288 जागा लढणार असल्याचे आज जाहीर केले आहे. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बालवाडी ते 10 वी पर्यंतचे मुलींना सर्व शाळांमध्ये मोफत शिक्षण द्यावे, अशी मागणीही देखील बिचुकले यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र देखील बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, अभिजीत बिचुकलेंनी कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत अर्ज दाखल केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com