'मुस्लीम आरक्षणाच्या भीतीने आम्हाला बैठकीला बोलावलं नाही' - अबू आझमी

'मुस्लीम आरक्षणाच्या भीतीने आम्हाला बैठकीला बोलावलं नाही' - अबू आझमी

समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रईस शेख यांच्या कार्यकाळास चार वर्ष पूर्ण झाल्याने भिवंडीत समाजवादी पक्षाच्या परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रईस शेख यांच्या कार्यकाळास चार वर्ष पूर्ण झाल्याने भिवंडीत समाजवादी पक्षाच्या परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी हे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

अबू आझमी म्हणाले की, सकल मराठा आंदोलन करणाऱ्यांनी आपली ताकद दाखवली त्यामुळे सरकार त्यांच्या पायाशी गेले. मराठा आरक्षण प्रश्नावर सर्व पक्षीय सभा झाली ज्यांचे एक ही आमदार नाही त्यांना आमंत्रण दिले फक्त समाजवादी पक्षाला डावललं. आम्ही मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मांडू याची भीती सर्व राजकीय पक्षांना वाटली होती. सरकार मराठा आंदोलकांना रात्री उशिरा पर्यंत आंदोलन करायला परवानगी देते.

आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी सह नोव्हेंबर रोजी मुंबईत सायकल मोर्चा काढणार आहोत. त्याला पोलिस आडकाठी करतात.पण आम्ही आंदोलना वर ठाम असून हिम्मत असेल तर अडवून दाखवा असा इशारा देत मुस्लिम आपली मक्तेदारी असल्याचा दावा करणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुध्दा मुस्लिम आरक्षणासाठी काही ही केले नाही असा आरोप अबू आझमी यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com