terrorists | Union Minister Giriraj Singh | IB Report
terrorists | Union Minister Giriraj Singh | IB Reportteam lokshahi

हा नेता दहशतवाद्यांच्या टार्गेट लिस्टमध्ये, आयबीच्या अहवालात उघड

फोनवर आल्या अनेक धमक्या
Published by :
Shubham Tate

भाजपचे फायरब्रँड नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हेही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आले आहेत. भाजपचे अनेक नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा दावा आयबीच्या अहवालात करण्यात आला आहे. यामध्ये गिरीराज सिंह यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. त्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानेही जारी केली आहे, इस्लामिक स्टेट खोरासान या दहशतवादी संघटनेने आपल्या मासिकाच्या नवीन आवृत्तीत भाजपविरोधातील हल्ल्याबाबत लिहिले आहे. हल्ल्याबाबत लिहिल्यानंतर या दहशतवादी संघटनेने आपल्या ट्विटर हँडलवरही ते शेअर केले आहे. याआधीही गिरिराज सिंह यांना फोनवरून धमक्या आल्या आहेत. (according to the ib-report union minister giriraj singh included many bjp leader are on the target of terrorists)

terrorists | Union Minister Giriraj Singh | IB Report
आम्ही धक्के दिले तर भारी पडणार; भाजप व शिंदे गट आमने-सामने

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेले गिरिराज हे एकमेव मंत्री नसून भाजप आणि बिहार भाजपच्या अनेक नेत्यांची नावे दहशतवाद्यांच्या यादीत आहेत. याबाबतची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यावर बिहार पोलीस मुख्यालयाने सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस मुख्यालयाकडून पत्रही जारी करण्यात आले आहे.

पोलीस मुख्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, 'खोरासान डायरी'ने 14 जुलै रोजी ट्विटरवर इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) चे कव्हर पेज शेअर केले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. 'व्हॉइस ऑफ खोरासान' मासिकाने भाजपविरोधातील हल्ल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे समाजात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिसांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

terrorists | Union Minister Giriraj Singh | IB Report
मंत्रिपदासाठी 90 कोटींची मागणी, 20 टक्के अॅडव्हान्स, 4 जणांना अटक

बिहार भाजपच्या अनेक नेत्यांना 'वाय' सुरक्षा

बिहारमध्ये भाजपचे १७ खासदार आहेत. त्यापैकी गिरीराज सिंह आणि अश्विनी चौबे हे देखील केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. यासोबतच हरिभूषण ठाकूर बच्चौल, संजीव चौरसिया, गिरीराज सिंह आणि अश्विनी चौबे हे सर्व नेते हिंदुत्वाबाबत नेहमीच बोलत असतात. यासोबतच बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संजय जयस्वाल आणि राज्यसभा खासदार विवेक ठाकूर यांनीही आपल्या वक्तव्यातून कट्टरवाद्यांवर निशाणा साधला आहे. अग्निपथ योजनेवरून झालेल्या गदारोळात भाजपच्या अनेक नेत्यांनाही Y सुरक्षा दिली गेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com