Video : आदित्य ठाकरे यांच्या गाडीला शिवसेना भवनासमोरच अपघात

आदित्य ठाकरेंची गाडी आणि बाईकस्वारमध्ये धडक झाल्याचे समजत असून दोघेही सुखरुप आहेत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीला शिवसेना भवनासमोरच अपघात झालेला आहे. आदित्य ठाकरेंची गाडी आणि बाईकस्वारमध्ये धडक झाल्याचे समजत असून दोघेही सुखरुप आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आल्यानंतर ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

माहितीनुसार, आदित्य ठाकरे आज शिवसेना भवन येथे बैठकीसाठी येत होते. याचवेळेस गाडीच्या मागून आलेला बाईकस्वार आदित्य ठाकरे यांच्या गाडीला धडकला. शिवसेना भवन येथील सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे उजव्या बाजूला वळण घेत होते. तेव्हा अचानक वेगाने बाईकस्वार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असता तो गाडीला धडकला. आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे आल्यानंतर यावेळी शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला सांगितली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com