सरकार नेमके कुणाचे जनरल डायर का भाजपाचे? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल

जालना घटनेचं पडसाद राज्यभरात उमटत असून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. अशातच, आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे पडसाद राज्यभरात उमटत असून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. राज्यभरात आज मविआकडून आंदोलने करण्यात येत आहेत. अशातच, आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. खोके सरकारने आता राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.

आपण सर्वांनी ती घटना टीव्हीवर पहिली आहे. हा लाठीचार मुद्दामहून केला आहे. मी दोन वर्ष मुख्यमंत्री यांचे कार्यालय जवळून पाहिले आहे. त्यांच्या आदेशाशिवाय लाठीचार्ज होऊच शकत नाही. या खोके सरकारने आता राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. तसेच, हे सरकार कुणाचे आहे नेमके जनरल डायर का भाजपाचे, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

या सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काही राहिले नाही. हे सरकार बिल्डरांचे आहे. ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस मी स्वतः राज्याचा दौरा केला होता. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com