'खोके सरकारवर विश्वास नसल्यानेच पावणे दोन लाख कोटींचा ‘तो’ प्रकल्प गुजरातला गेला'

'खोके सरकारवर विश्वास नसल्यानेच पावणे दोन लाख कोटींचा ‘तो’ प्रकल्प गुजरातला गेला'

आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर घणाघाती टीका

मुंबई : नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही. म्हणूनच प्रकल्प गुजरातला गेला, असे टीकास्त्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर सोडले आहे. वेदांता महाराष्ट्रातील प्रकल्प स्थापन न करता गुजरातला जाणार असल्याच्या बातमीवर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मला सकाळी जेव्हा बातमी समजली तेव्हा मला धक्का बसला. सुभाष देसाई आणि मी या कंपनी सोबत चर्चा करत होतो. पुण्यातील तळेगाव येथे प्रकल्प आणण्याचं कंपनीने ठरवलं होते. हा उद्योग पावणे दोन लाख कोटींएवढा आहे. 160 इंडस्ट्री यामध्ये होत्या. हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. दुसऱ्या राज्यात गेल्याचं दुःख नाही. पण, आपल्या राज्यातून का गेलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे 90 टक्के ठरले होते. नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही. मी यांना खोके सरकारच म्हणतो. स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

कुणी पिस्तुल चालवतो, कोणी धमकवतो. प्रशासन, कायदा सुव्यवस्था यावर कोणाचाही अंकुश नाहीये, असा निशाणाही त्यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर साधला आहे. lj, उदय सामंत यांचा अभ्यास कमी आहे हेच ते दाखवत आहेत. राजकारण आम्ही करत नाही. कोरोना काळात राजकारण करू नका असं म्हटलं होतं. पण, काय झालं. आता जे सरकार आहे. त्याच्यावरच कोणाला विश्वास नाही तर त्याला केंद्राला काय जबाबदार धरणार का? केंद्राच्या विरोधातील सरकार राज्यात होतं, तेव्हा कंपनी यायला तयार होती. गेल्या महिन्यात तयार असलेली कंपनी आता का तिकडे गेली याचं उत्तर त्यांनी द्यावं, असेही आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.

आमच्याशी गद्दारी करून अजून देखील राजकारणात व्यस्त आहेत. आता तरी ते बाजूला करून महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष द्या, असा सल्लादेखील त्यांनी शिंदे सरकारला दिला आहे. महाराष्ट्रातून उद्योग पळवण्यात यशस्वी झालेत. उद्योग तिकडे का गेले याचं उत्तर द्यावं, असा जाबही आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com